आपली सेवा आमचे कर्तव्य

महा ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्र हे ज्ञानाचा पोर्टल आहे. या पोर्टल द्वारे देशाच्या सामाजिक विकासाच्या विभागांमधील विशिष्ठ गरजाकडे लक्ष दिले जाते. हे बहुभाषिक पोर्टल एक खिडकी योजने प्रमाणे, महाराष्टृ शासनाच्या वेब पोर्टल ची माहिती एकाच ठिकाणी यांची माहिती पुरवते आणि विशिष्ट उद्देश सह म्हणजेच दुर्लक्षित लोकांपर्यत विशेषतः गरीब जनते पर्यत पोहचण्याचे काम करते. यात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व सामाजिक ग्रामीण भागातील विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

महा ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्र हे सरकार, नागरी समाज गट/ स्वयंसेवी संस्था आणि खाजगी संस्थां यांचे दुवे प्रदान करून,  ग्रामीण भागातील गरीब लोक व विकास यातील अंतर कमी करण्याचे काम करत आहे. सेवाभिमुख, लोकाभिमुख, सुलभ असे माहिती तंत्रज्ञान हेच या पोर्टलचे अंतिम ध्येय आहे.माहिती महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातूनच विविध संस्था निरनिराळ्या प्रकल्पां मार्फत ग्रामीण स्तरावर बदल घडवून आणत आहेत. महा ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्र हे सर्व आवश्यक माहिती लोकांना त्यांच्याच भाषेत त्यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करते.

हे पोर्टल, भारत सरकारच्या डिजिटल इंडिया सर्पार्ट उपक्रमा मध्ये महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र डिजिटल नवनिर्माणासाठी तयार करण्यात आलेले आहे.

भारत सरकारच्या कॉर्पोरेट इंडिया ऑफ कॉर्पोरेट सर्व्हिस सेंटर ऑफ इनकॉर्पोरेशन [कंपनी अधिनियम, 2013 (2013 चा 18) च्या कलम 7 च्या उप-कलम (2) आणि कंपन्या (इनकॉर्पोरेशन) नियम, 2014 च्या नियम 18 के संपूर्ण स्वमित्वाधीन अधिनियमाखाली या क्रमांकाने नोंदणीकृत: U85320PN2018NPL180645. महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनची स्थापना 2018 ला  करण्यात आली आहे.

संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सेवेचा हक्क देणारी क्रांतीकारी अशी ऑनलाईन केंद्र उभी करत असताना राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना या केंद्रांचा जास्तीत जास्त उपयोग होण्याकरता प्रत्येक गावागावांत अशाप्रकारची केंद्र उभारण्याचा मानस आहे. सरकार आणि प्रायव्हेट(खाजगी) क्षेत्रातून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती ऑनलाईन पद्धतीने त्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महा. ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली.

या केंद्रांतर्गत  कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण महा. ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्राच्या अधिकृत वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता आपल्या गावातील अथवा गावाजवळील महा. ग्रामीण डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन माहिती उपलब्ध करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात येत असल्यास आपण दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा अथवा दिलेल्या पत्त्यावर आम्हाला पत्राद्वारे लिहून कळवा.

Close Menu
×
×

Cart